घोन्सा येथे लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेली असताना पतीचे टोकाचे पाऊल

11

सुशील ओझा, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या घोन्सा येथे एका लाईनमनने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किशोर बंडू भोसकर (35) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान किशोरने आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

सविस्तर वृत्त असे की किशोर बंडू भोसकर हा कुंभारखनी येथील रहिवाशी होता. तो लाईनमन म्हणून काम करायचा. आपली व मुलगी व पत्नीसह तो घोन्सा येथे राहत होता. सध्या त्यांची पत्नी गर्भवती असल्याने ती डिलेव्हरीसाठी मुलीला घेऊन माहेरी गेली होती. त्यामुळे किशोर घरी एकटाच असायचा.

आज संध्याकाळी 6.00 वाजताच्या सुमारास किशोरने घराच्या छताच्या हुकला दोरीने गळफास लावला. दरम्यान काही वेळाने ही घटना शेजारीच राहत असलेल्या त्यांच्या भावाला कळली. त्यांनी त्वरित याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार अनिल सकवान, दिलीप जाधव, नईम शेख, होमगार्ड प्रज्योत ताडुरवार हे पोलीस वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता वणी येथे पाठविला आहे. किशोरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार अनिल सकवान व संजय खांडेकर करीत आहे.

हे देखील वाचा:

विधवा महिलेचा अल्पवयीन बालकाने केला विनयभंग

पीककर्ज भरलेल्या रकमेपेक्षा मंजूर कर्जाची रक्कम कमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.