शासनाच्या सीसीआय केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

मुकूटबनमध्ये सीसीआय कापसाची खरेदी सुरु, 4 हजार 320 रुपये भाव

0 553

रफीक कनोजे, मुकूटबन: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये सीसीआय तर्फे कापुस खरेदी केन्द्राचा सोमवारी सकाळी १० वाजता मुहुर्त ठेवण्यात आला. सीसीआय केंद्र सुरु होण्यापुर्वी सोळा शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. पण कोणत्याही शेतकऱ्यांनी कापुस कृषि उत्पन्न समितीच्या यार्डात आणला नाही. सीसीआय तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सचिव यांच्या मार्फत हा मुहुर्त ठेवण्यात आला. यात शासनाचा कापसाला 4  हजार 320 रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. कापसाला आठ ते बारा  टक्के (ओलावा) माईश्चर सुट देण्यात येणार आहे असे सीसीआयचे केंद्रप्रमुख सुमीत देशमुख यांनी सांगितले.

शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शासनाकडून दिलेल्या भावाबद्दल  शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट उमटत होती. कापसात ओलावा असल्याचं कारण समोर करीत सीसीआयने  खरेदी केन्द्रे दिवाळीच्या २०  दिवसानंतर सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली. अनेक व्यापाऱ्यांनी कापसाची खेड़ा खरेदी सुरु करुन गरीब शेतकऱ्यांचे कवडी मोल भावाने खरेदी केली. परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे पीक खराब झाले. काही प्रमाणात कापुस ओला झालं त्यामुळे खरेदी उशीरा करण्यात आली. ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के करण्यात यावे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघातर्फे ठराव घेण्यात घेवून शासनाकडे पाठवून पाठपुरावा करु असा तोंडी आदेश संदीप बुरेवार यांनी संचालक मंडळाना दिला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सचिव रमेश येल्टीवार, सभापती संदिप बुर्रेवार, उपसभापती संदीप विंचू, संचालक बापूराव जिन्नावार, गजानन मांडवकर, सुनील ढाले, भुमरेड्डी बाजनलावार, भगवान चुकलवार (सरपंच), बळी पेंदोर, मधुकर चेलपेलवार, तुळसीराम झाडे व इतर मान्यवर हजर होते

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.