ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली

मटका व्यावसायिक व शहरातील भाईगिरींवर सुरुंग लावण्यात यशस्वी

16

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव यांची नागपूर येथे बदली झाली आहे. 30 ऑगस्ट रोजी त्यांना बदली बाबत ऑर्डर मिळाली. पोलीस निरीक्षक वैभव जाधव हे वणी पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून जवळपास 30 महिने कर्तव्यावर होते. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा ते वणीत आले त्यावेळी त्यांची जी भूमिका होती तीच भूमिका त्यांची शेवटपर्यंत कायम राहली. शहरातील मटका व्यावसायिकांवर व शहरातील भाईगिरींवर सुरुंग लावण्याचे काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. याशिवाय कोरोना काळात त्यांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य चोखपणे बजावले.

वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव हे अडीच वर्षांपूर्वी वणीत आले. या 30 महिन्यात त्यांनी अनेक गुन्हाच तपास करून आपली कारकीर्द यशस्वी करून दाखविली. वणीचे ठाणेदार पद भूषवित असतांना त्यांना पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, दक्षता कमेटी, लोकप्रतिनिधी, वणीतील जनता, सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना व वणीतील विविध संघटना यांची साथ लाभली. याबाबत त्यांनी सर्वांचे धन्यवाद देऊन आभार मानले.

डिसेंबर 2020 ला नांदेपेर रोड येथे एका महिलेचा खून झाला होता. आणि आरोपीची ओळख करून अटक करणे हे मोठे आव्हान होते. परंतु चंद्रपूर जिल्हातील आरोपीला 24 तासाच्या आत अटक करण्यात आली. हा तपास सदैव आठवणीत राहील असे मनोगत त्यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केले. वणीकरांनी जे प्रेम दिली त्याबाबत त्यांनी वणीकर जनतेचे आभार देखील मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.