घोडदरा-शिवनाळा शिवारात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

घातपाताचा प्राथमिक अंदाज, परिसरात खळबळ

0 15

भास्कर राऊत, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मारेगाव यवतमाळ रोडवरील घोडदरा व शिवानाळा या गावाच्या दरम्यान एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. घोडदरा शिवारातील गजाजन धनवे यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली आहे. सदर तरुणाचे वय 24 ते 25 दरम्यान असल्याचा अंदाज आहे. घटनेची मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मारेगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेचा पंचनामा सुरू आहे. सदर मृतदेहाबाबत आत्महत्या की घातपात याबाबत चर्चा सुरू असून घातपाताचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपडेट – सदर तरुणाची ओळख पटली आहे. मृतकाचे नाव प्रमोद नामदेव रामपुरे (22) असून तो तालुक्यातीलच अर्जुनी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. 

(अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल.)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.