थरार… हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्यास अटक

पोलिसांनी सिनेस्टाईल आवळल्या आरोपीच्या मुसक्या... रजानगर भागातील घटना

0 13

जितेंद्र कोठारी, वणी: हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी शिताफीने अटक करून बेड्या ठोकल्या आहे. शहरातील रजानगर भागात शनिवार 31 जुलै रोजी दुपारी 3.15 वाजता दरम्यान ही घटना घडली.

वणी पोलीस डीबी पथक प्रमुख पोऊनी गोपाल जाधव यांना पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली होती. माहितीवरून पोलीस पथक रजानगर येथे पोहचले असता शेख ऐय्याज यांच्या घराजवळ एक व्यक्ती हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आला. पोलिसांनी आरोपीस सरेंडर करण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांच्या दिशेने तलवार फिरवून भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी शिताफीने झडप घालून आरोपी राजू पुरुषोत्तम पोटे (38) रा. नवीन वागदरा यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीकडून निमुळते टोकाची 28 इंची लांबीची लोखंडी धारदार तलवार जप्त केली. आरोपी विरुद्द कलम 4,5 भारतीय शस्त्र कायदा कलम 269 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही पोऊनी गोपाल जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथक कर्मचाऱ्यांनी केली.

हे देखील वाचा:

वणी पोलिसांचे गोमांस विक्रेत्याविरोधात धाडसत्र, 320 किलो गोमांस जप्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.