झरी तालुक्यात “गाव तेथे युवासेना” अभियानाला सुरूवात

तालुक्यात युवासेना वाढविण्यास शिवसैनिक सज्ज

0 11

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिवसेना प्रणीत युवासेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत गाव तेथे युवा सेना व गाव तेथे शाखा हे या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. झरी तालुक्यातील कृ.ऊ.बा. समिती मुकुटबण येथे बैठक पार पडली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, कार्यकरणी सदस्य युवा सेना रुपेश कदम यांच्या आदेशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी युवा सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्ताना मार्गदर्शन करुन प्रत्येक गावात युवा सेना बळकट करणयचे आवाहन केले. तसेच गाव तेथे शाखा हे अभियान गाव गावी राबवावी असे कार्यकर्तांना सुचविले.

शिवसेना तालुका प्रमुखशि चंद्रकांत घुगुल यांनी युवा सेने सोबत खंबीरपणे उभे राहीन असे बैठकीत जाहीर केले. कार्यक्रमाची प्रस्तावना युवा सेना तालुका संघटक नीलेश बेलेकार यांनी केली व त्यावेळी युवा सेना तालुका प्रमुख पवन राऊत प्रसिद्धी प्रमुख प्रमोद गालेवार उप तालुका प्रमुख मनिष भोयर विभाग प्रमुख चेतन बासेट्टीवार अनिल डेगरवार राहुल राजुरकार मंगेश मोहितकर निखिल ठाकरे पंकज पानघाते सचिन कोठारी वैभव मेश्राम

निखिल निखाडे, सुरज केळझरकर, भुषण आस्वले, शंकर मोहीतकार, गणेश पोले, स्वप्नील आगिरकर, सौरभ मंडलवार, सागर आवारी, कुणाल टेकाम, शेख आमिर शेख उस्मान, नितीन मासिरकार, दशरत रामडवार ,सुरज मासीरकार, शशिकांत क्षीरसागर ,अविनाश मांढरे ,सचिन टोंगे, प्रशिक बरडे उपस्थित होते.

हे देखील वाचा:

बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.