गोदावरी अर्बन बँकेचा वर्धापण दिन साजरा

कोरोनामुळे साध्या पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा

0 11

सुशील ओझा, झरी: गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड- शाखा मुकुटबनचा पहिला वर्धापन दिन शाखा कार्यालयात उत्साहात मात्र कोरोना नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक खासदार  हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, मुख्यव्यवस्थापक सुरेखा दवे यांच्या नेतृत्वात अल्पावधीतच 1350 कोटींपेक्षा ही जास्त ठेवींचा टप्पा गाठत सहकार क्षेत्रात यशस्वी गगनभरारी घेत असलेल्या गोदावरी अर्बनच्या मुकुटबन शाखेचे यश देखील वाखाणण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया व्यवस्थापन समितीचे सभासद मंगेश गादेवार यांनी दिली.
मुकुटबन परिसरात सेवा देताना आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही व संस्थेसह सभासदांच्या विकासाकरिता सदैव तत्पर राहू असे शाखा प्रभारी धम्मपाल निमसरकार यांनी सांगितले. याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सभासद, शाखेतील संपूर्ण कर्मचारी, सर्व सन्माननीय दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधी तथा इतर सभासद उपस्थित होते.

हे देखील वाचा:

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.