अनुकंपा तत्वावर नियुक्ती करिता आई आणि मुलाचं उपोषण

विदर्भ राज्य आघाडीची भेट, दर्शवला पाठिंबा

0 386

निकेश जिलठे, वणी: नगर परिषद वणी समोर श्रीमती शांता मनोहर कौटमवार आणि रवी मनोहर कौटमवार उपोषणास बसले आहे. श्री मनोहर बालाजी कौटमवार हे नगर परिषद येथे सफाई कामगार पदावर कार्यरत होते. दि. १९/०३/२०१० रोजी नगर परिषद चे सेवेत कार्यरत असताना मरण पावले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याच्या मुलास नोकरीवर सामावून घेण्यात यावे याकरिता २०१० पासून ते पाठपुरावा करत आहेत. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

सोमवारी 30 ऑक्टोबरपासून आई आणि मुलगा न्याय मिळावा यासाठी उपोषणाला बसले आहेत. विदर्भ राज्य आघाडीचे पदाधिकारी अजय पोहाणे, राजकिरण कहाते आणि कार्यकर्ते यांनी जाऊन त्यांची समस्या जाणून घेतली. तसंच त्यांच्या उपोषणास त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.