वंचित बहुजन आघाडीतर्फे 16 जुलै रोजी परिचय सभेचे आयोजन

महिला व शहर कार्यकारिणी गठन व मीडिया प्रमुख निवडीसाठी होणार चर्चा

0 18

जितेंद्र कोठारी, वणी: वंचित बहुजन आघाडी वणी तालुका कार्यकारणीची प्रथम परिचय सभा दि 16 जुलै रोजी शासकीय विश्राम गृह वणी येथे आयोजित करण्यात आली आहे. बहुजन आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन होणार आहे. यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. 

सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा संघटक सुभाष लसंते, मिलिंद पाटील आदी उपस्थित राहणार आहे. परिचय सभेत महिला कार्यकारणी, शहर कार्यकारणी ग्रामीण भागातील गाव बांधणी, सोशल मीडिया प्रमुखाची नियुक्ती करणे आणि ऑनलाइन झूम मिटिंग संदर्भात चर्चा होणार आहे.

तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सतीश गेडाम, प्रल्हाद चामाटे, बाळू निखाडे, निशिकांत पाटील, किशोर मुन प्रा. वेले , पुरुषोत्तम नवघरे, विनोद ढेरे, शंकर रामटेके, कपिल मेश्राम, बंटी तांमगाडगे, राजू चापडे, अजय खोब्रागडे आदींनी केले आहे. अशी महिती तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.