आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण

आता तालुक्यात 13 ऍक्टिव्ह रुग्ण

0 11

जब्बार चीनी, वणी: दोन दिवसांच्या गॅप नंतर आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. यातील एक शहरातील विठ्ठलवाडी येथील तर दुसरा रुग्ण हा वडकी येथील आहे. याशिवाय आज 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता तालुक्यात केवळ 13 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज यवतमाळहून 71 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 2 पॉझिटिव्ह आलेत. तर आज 84 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून यवतमाळ येथे 21 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 21 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 13 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 2 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 7 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 4 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5259 रुग्ण आढळून आलेत. यातील 5153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

साईनगरीत रस्त्याचे रूपांतर झाले तलावात

चिखलगाव येथील तो जीवघेणा खड्डा बुजवला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.