आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा दर अधिक, आता 22 ऍक्टिव्ह रुग्ण

0 14

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 22 झाली आहे. सध्या रुग्णसंख्येच्या दरापेक्षा कोरोनावर मात करणा-यांचा दर अधिक असल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

आज गुरुवारी दिनांक 10 जून रोजी यवतमाळहून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही. मात्र आज 99 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून यवतमाळ येथे 21 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 99 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 25 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 3 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 14 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 5 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 5252 रुग्ण आढळून आलेत. यातील 5137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

वणीसह ग्रामीण भागातही आज दमदार पाऊस

कुंभा येथे विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.