खैरगाव (बुट्टी) येथे नागरिकांना सॅनिटाईझर चे वाटप

शिवसेना मारेगाव शाखेचा उपक्रम

0 13

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथील नागरिकांना हॅन्ड सॅनिटाईझरचे वाटप शिवसेना तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आले. 80% समाजकारण तर केवळ 20% टक्के राजकारण शिवसेनेच्या ब्रिदवाक्याप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या सूचनेवरून वणी विधानसभा क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम शिवसेना पक्षाच्या वतीने राबविण्यात आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बुट्टी) येथील शेकडो ग्रामस्थांना कोरोना विषाणूच्या बचावासाठी हँड सॅनिटाईझरचे वाटप शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी कोरोना विषाणूच्या संदर्भात, ग्रामस्थांना मार्गदर्शनसुद्धा करण्यात आले. तसेच हॅन्ड सॅनिटाईझरच्या वापरासंबंधी त्याचे महत्वसुध्दा ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा पं.स.उपसभापती संजय आवारी व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

हेदेखील वाचा

बूट हाऊसला आग, वेळीच आग विझवल्याने मोठी हानी टळली

हेदेखील वाचा

कोरोनातही जुगार जोमात, शिरपूर व गोपालपूर येथे छापा

हेदेखील वाचा

जब दीप जले आना’ ऑनलाईन मैफल रंगली

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.