आज तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण

वणी शहरात 3 तर ग्रामीण भागात 18 पॉझिटिव्ह

0 14

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी तालुक्यात कोरोनाचे 21 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 3 रुग्ण तर ग्रामीण भागातील 18 रुग्ण आहेत. वणी शहरात आलेल्या 3 रुग्णांपैकी जैताईनगर, आंबेडकर चौक, वासेकर ले आऊट येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. तर ग्रामीण भागांत कुंड्रा 6, शिरपूर 5, पुनवट 4, भालर कॉलनी 2, गणेशपूर 1 असे रुग्ण आढळलेत. दरम्यान आज 9 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 244 आहे.

आज यवतमाळ येथून 244 अहवाल प्राप्त झालेत. यात 14 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 126 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 7 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 313 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 702 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 244 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 25 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 173 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 42 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5200 रुग्ण आढळून आलेत. यातील 4874 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 86 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

मारेगाव तालुक्यात आज 3 पॉजिटिव्ह तर एकाचा मृत्यू

भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने बुध्द जयंती साजरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.