भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने बुध्द जयंती साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केले अभिवादन

0 13

बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने तथागत भगवान बुध्द यांची २५६५वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वनकरआणि ऊल्लास पेटकर यांनी मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित केली.

संस्थेच्या अध्यक्षा सुचिता पाटील, वैशाली पाटील, केंद्रीय शिक्षिका सुषमा दूधगवळी, उपाध्यक्षा करुणा कांबळे, दुबे, विवेक तेलंग, चंद्रसेन जीवने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना दिली.

सामूहिक सूत्तपठन घेण्यात आले. संचालन संस्थेचे महासचिव रमेश तेलंग यांनी केले. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग केंदीय शिक्षक मिलिंद पाटील, बौधाचार्य दादा घडले, आनंद पाटील, किशोर मून, रवी कांबळे, राजू भगत, चंदू पड्वेकर, गौतम धोटे, लटारी ब्राम्हने उपस्थित होते. शरणंग गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेदेखील वाचा

वणीमध्ये सलग तिस-या दिवशी अवघा 1 रुग्ण

हेदेखील वाचा

अतिक्रमित जागा खाली करण्यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम

हेदेखील वाचा

आज मारेगाव तालुक्यात 29 पॉझिटिव्ह

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.