मारेगाव तालुक्याला दिलासा, 16 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 13 पॉझिटिव्ह तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 169

0 13

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 23 में रोजी तालुक्यात केवळ 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सर्व 13 ही रुग्ण ग्रामीण भागांतील आहेत. यात 3 पुरुष 10 महिलांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 16 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे.

आज आरोग्य विभागाने 45 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही आहे. तसेच आज 557 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट यवतमाळ वरून प्राप्त झाले. त्यात 13 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहे. यात 3 पुरुष 10 महिलांचा समावेश आहे.

हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तालुक्यात सध्या 169 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 27 रुग्ण उपचार घेत आहे तर 123 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेत कोविड हेल्थ सेंटरवर 9 तर 10 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.तर आज 17 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.तालुक्यात दिवसेंदिवस पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे.

हेदेखील वाचा

वणी शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज अवघा 1 रुग्ण

हेदेखील वाचा

जेव्हा भाजीविक्रेते स्वत:च उलटवतात आपला माल….

हेदेखील वाचा

कोरोना पेशंटसाठी रिलायन्स झाले उदार!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.