आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

तालुक्यात सध्या 183 ऍक्टिव्ह रुग्ण

0 13

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 21 में रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळले. यात शहरातील 6 व ग्रामीण भागातील 48 रुग्ण आहेत. यात 30 पुरुष व 24 महिलाचा समावेश आहे. तर आज 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज आरोग्य विभागाने 380 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 667 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट यवतमाळ वरून प्राप्त झाले. या 48 पॉझिटिव्ह आलेत. असे एकूण 54 रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. अद्याप 909 व्यक्तींचा आरटिपीसीआर रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 183 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटर वर 23 रुग्ण उपचार घेत आहे तर 142 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 8 तर 10 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात अवघे 26 पॉझिटिव्ह, शेलू (खु) येथे 9 रुग्ण

लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.