कीटकनाशकांच्या कमतरतेमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

कार्यवाहीच्या धास्तीने कीटकनाशकांची विक्री बंद

0 346

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यात सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मुकुटबन, पिंपरड, येडशी, अडेगाव, खातेरा, बहिलमपुर, मांगली , राजूर, हिरापूर, भेंडाळा व इतर गावात ही समस्या दिसून येत आहे. परिसरातील शेतीत असणारे कापसाचे बोंड बाहेरून छान हिरवेगार दिसत आहे. पण त्या बोंडाना फोडून पाहिले असता त्यात बोंडअळ्या आढळून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

१०० पैकी ८० टक्के कापसांच्या बोंडामधे बोंडअळी आढळुन आली. त्यामुळे बोंडांची वाढ खुंटली आहे. इतर पिकांवर सुध्दा रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला. याबाबत काही गावातील शेतक-यांनी कृषी अधिका-यांकडे धाव घेतली तर मुकुटबन येथील शेतक-यांनी सरपंच शंकर लाकडे यांच्याकडे धाव घेतली. शंकर लाकडे यांनी कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली.

जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २२ शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागले. कार्यवाहीच्या धास्तीने कृषीकेंद्र संचालकानी कीटकनाशके विकणे बंद केले. त्यामुळे शेतक-यांना फवारणीसाठी औषधी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पीकपाहणीच्या पथकात सित्तावार (सहाय्यक कृषी अधिकारि झरी) येरावार (मंडळ अधिकारी, मुकुटबन), जाधव (ग्रांमविकास अधिकारी, मुकूटबन),  गायकवाड (तलाठी मुकूटबन), सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच मधुकर   आगुलवार, विकास मंदावार, सुदर्शन तिपर्तिवार, संजय आकिनवार, नागेश अक्केवार व इतर शेतकरी पथकात होते. यावेळी सरपंच शंकर लाकडे यांनी शेतक-यांना शासनातर्फे कीटकनाशकांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.