मारेगावात दिवसाढवळ्या चोरट्याने चोरली दुचाकी

चोरी सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

0 16

नागेश रायपुरे, मारेगाव: दिवसा ढवळ्या घरासमोर झाडाच्या सावलीत उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली. मारेगाव शहरात नगर पंचायतीच्या मागे प्रभाग क्र. 3 मध्ये दुपारी 12.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. मात्र घटनास्थळा वरून दुचाकी करताना अज्ञात चोरटा नगर पंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

प्रभाग क्र. 3 मध्ये नगर पंचायत इमारतीच्या मागे शिवराम भोगेकर हे वास्तव्य करत आहे. त्यांनी नेहमी प्रमाणे आपली स्प्लेडर प्लस (MH AJ 6564) दुचाकी घरासमोरील रोडच्या बाजूला झाडाच्या सावलीत उभी करून ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून पसार झाला आहे. दुचाकी वर “लावण्या” असे नावं लिहलेले आहे.

मात्र अज्ञात चोरटा नगर पंचायतच्या मागील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. वृत्त लिही परंत घटनेच्या तक्रारीची प्रक्रिया चालू होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे शहरातील नागरिक घरा बाहेर निघणे टाळत असल्याने शहरात सर्वत्र “सून सान गली, परेशान रोड” चे सावट आले आहे. त्याचाच फायदा उचलत दुचाकी चोर शहरात सक्रीय झाल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात 63 रुग्ण तर 118 रुग्णांची कोरोनावर मात

उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.