आज तालुक्यात 63 रुग्ण तर 118 रुग्णांची कोरोनावर मात

आज 1124 पैकी 63 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घसरण

0 16

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 20 मे रोजी तालुक्यात 63 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहरातील 16 तर ग्रामीण भागातील 41 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात कवडशी येथे सर्वाधिक 10 रुग्ण आढळलेत. आज 118 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर हा दिवसेंदिवर कमी होत आहे व ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंंदिवस कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

वणीत आलेल्या 16 रुग्णांमध्ये इंदिरा चौक येथे 2 रुग्ण तर दामले फैल, सर्वोदय चौक, काळे ले आऊट, टिळक नगर, ओम नगर, रंगारीपुरा, पटवारी कॉलनी, तेली फैल, कोंडावार ले आऊट, साई मंदिर, प्रगती नगर, मोमिनपुरा, विठ्ठलवाडी, आंबेडकर चौ क येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात आलेल्या 41 रुग्णांमध्ये कवडशी येथे सर्वाधिक 10 रुग्ण आढळलेत. तर साखरा व निंबाळा येथे प्रत्येकी 4 राजूर, नेरड येथे 3, हनुमान नगर, शिरपूर, कोरंबी मारेगाव, परसोडा, एसीसी शिंदोला येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर वरझडी, मुर्धोनी, चारगाव, चिखलगाव, गणेशपूर, वागदरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर झरी तालुका, भद्रावती येथील प्रत्येकी 2 रुग्ण व घुग्गुस व मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 678 अहवाल प्राप्त झालेत. यात 58 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 446 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 363 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 552 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 525 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 44 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 424 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 57 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5074 रुग्ण आढळून आलेत. यातील 4469 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

आज रुग्णसंख्येचा दर हा अवघा 5.6 टक्के
काल आरटीपीसीआर व रॅपिड ऍन्टीजन असे 848 पैकी 54 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. रुग्णसंख्येचा हा दर 6.3 टक्के होता. आज आरटीपीसीआर व रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केलेल्या 1124 व्यक्तींपैकी 63 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. हा दर 5.6 टक्के इतका आहे. रुग्णसंख्येचा दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. एका आठवड्याआधी हा दर 25 ते 30 टक्यांपर्यंत पोहोचला होता.

हे देखील वाचा:

छातीत सुरा भोकसून मुलाने केली पित्याची हत्या

उत्पादन शुल्क निरीक्षकाने अडीच लाखांची मागणी केल्याचा आरोप

वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.