मारेगाव तालुक्यात आज 39 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 406

0 21

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 15 में रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर दुसरीकडे 17 पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते बरे होवून घरी परतले आहे.  तसेच तालुक्यातील तिघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

आज तालुक्यातील 146 व्यक्तीची आरटिपीसीआर टेस्ट तर 253 व्यक्तीची रॅपीड टेस्ट केली असता त्यात केवळ 5 पॉझिटिव्ह रुग्ण रॅपीड मध्ये आढळले तर उर्वरित यवतमाळ वरून प्राप्त झालेल्या आरटिपीसीआर टेस्ट च्या रिपोर्ट नुसार 34 पॉझिटिव्ह असे एकूण तालुक्यात आज 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर 17 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होवून ते घरी परतले आहे.

तसेच आज तालुक्यातील तिघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.यात बोटोनी येथील 70 वर्षीय पुरुष, गोंडबुरांडा येथील 60 वर्षीय पुरूष तर कुंभा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 406 वर पोहचली आहे.यात 24 रुग्ण मारेगाव येथील कोविड सेंटर वर उपचार घेत आहे तर उर्वरित होम आयसोलेशन तर काही खाजगी मध्ये उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

वणीत रुग्णसंख्या झपाट्याने खाली, आज अवघे 4 पॉझिटिव्ह

मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.