एकाच कुटुंबातील तिघांना जेवणातून विषबाधा

भालर येथील घटना, रात्रीच्या जेवणाने केला घात

0 467

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भालर येथील तिघांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने तिघांनाही वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भालर येथील ही घटना असून मंगळवारी रात्री ही घटना घडली. सध्या पीडितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वणी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर येथील गुलाब वरारकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्रीचे जेवण केले. अवघ्या काही क्षणात त्यांना उलटी मळमळ व्ह्यायला लागली. एकापाठोपाठ एक घरातील व्यक्तींची प्रकृती बिघडली. हा प्रकार लक्षात येताच काहींनी जेवणाचे भांडे तपासले, तर त्यात पाल पडलेली आढळली.

यात निकिता गुलाब वरारकर (१२), वैभव विनोद वरारकर वय (१७), गुलाब पांडुरंग वरारकर (३५)  यांना विषबाधा झाली.  त्यांना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताचे सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयातील डॉ माधुरी तामगाडगे, मारोती किनाके आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. सध्या विषबाधा झालेल्या सदस्यांची प्रकृती स्थिर आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.