TDRF संस्थेतर्फे वणीत वृक्षारोपण

वर्धापण दिनानिमित्त संस्थेतर्फे विविध उपक्रम

0 14

पुरुषोत्तम नवघरे, वणी: TDRF या संस्थेतर्फे वणीत ठिकठिकाणी 50 झाडे लावण्यात आली. 9 मे 2021 रोजी संस्थेला 16 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला होता. दरवर्षी विविध उपक्रम राबवून संस्थेचा वर्धापण दिन साजरा करण्यात येतो मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुभावामुळे वृक्षारोपणद्वारा हा दिन साजरा करण्यात आला. TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला.

TDRF ही संस्था आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या वर्षीपासून ही संघटना लॉकडाऊन काळात कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे. सध्या या संस्थेद्वारा कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुस्कान सय्यद, गणेश बुरांडे, मनीष आवारी, अनुष्का नक्षणे, लक्ष्मीकांत गाडगे, आचल झिले, संकेत काळे, चेतन उलमले यांच्यासह TDRF संस्थेच्या सभासदांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.