वणीतील मुलांना व्यायामशाळेची ओढ लावणारे ‘बाबा’ गेले

पुरुषोत्तम उपाख्य बाबारावजी लक्ष्मण कुलदीवार यांचे निधन

0 13

विवेक तोटेवार, वणी: पुरुषोत्तम उपाख्य बाबारावजी लक्ष्मण कुलदीवार यांचे आज गुरुवारी दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दुःखद निधन झाले. बाबारावजी अतिशय विनम्र पण धडपड्या स्वभावाचे होते. आपल्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळेच मागील कित्येक वर्षांपासून वणीच्या सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.

नृसिंह व्यायामशाळेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना, त्यांनी कित्येक युवकांना व्यायाम शाळेची ओढ लावली होती. वणीच्या संस्कृतीची ओळख असणाऱ्या गुदल पेंडी या खेळाचे दरवर्षी होळीच्या पर्वावर आयोजन करण्यात त्यांचा सदैव पुढाकार असायचा. बाबारावजी सुरुवातीपासूनच काँग्रेस विचारसरणीचे असल्यामुळे या पक्षाची कास त्यांनी कधीच सोडली नाही. त्यांच्या निगर्वी स्वभावामुळे वणीत त्यांचा चाहता वर्ग व मित्रपरिवार मोठा होता.

हे देखील वाचा:

दिलासादायक… आज तब्बल 137 रुग्ण कोरोनामुक्त, तालुक्यात 40 रुग्ण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.