थोरांच्या विचारातच माझी दिवाळी, एका चिमुकल्याची अनोखी दिवाळी

आईच्या सहकार्याने केलेत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुलेंचे  पूजन

0 407
रवि ढुमणे, वणी: ऐन दिवाळीच्या दिवशी जिकडेतिकडे जल्लोष केला जात असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या रोहिणी मोहितकर यांचा मुलगा स्वर्ण याने आग्रह करून वात्सव स्वीकारीत दिवाळीच्या दिवशी घरी राजमाता जिजाऊ ,आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिवर्तनवादी वाटचालीस सुरुवात केली.
अवघ्या ७ वर्षाचा स्वर्ण या वयात इतर मुलांचा कल विविध प्रकारच्या गोष्टीकडे असतो. मात्र हा थोडा निराळाच आहे.  घरात पूर्वीपासून चालत आलेल्या धर्मीकतेला बगल देत त्याने थोरांचे विचार व त्यांचे कार्य यावर लक्ष केंद्रित करून वाटचालीस सुरुवात केली.
या बाबतीत  मुळात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेली स्वर्ण ची आई रोहिणी मोहितकर यांनी त्याला परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
दिवाळीचा सण जिकडेतिकडे फटाक्यांची आतिषबाजी त्यात या चिमुकल्याने कोणताही जल्लोष न करता घरी  राजमाता जिजाऊ, व शिक्षणाची देवता आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवाळी साजरी केली.  सणासुदीला मुलांना वेगळीच ओढ असते परंतु यात त्याने थोरांच्या विचारांनी दिवाळी साजरी केली आहे.  यानिमित्ताने वणी बहुगुणीच्या वतीने या चिमुकल्याला सलाम ! व परिवर्तन वादी विचारांच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.