आज रंगणार सिंफनी गृपची गुलजार स्पेशल मैफल

सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावतीचा उपक्रम

0 16

बहुगुणी डेस्क, अमरावतीः– गीतकार गुलजार म्हणजे सिनेगीतांनादेखील पडलेलं एक सोनेरी स्वप्न. गुलजार यांनी लिहिलेली अनेक गीत अजरामर झालीत. त्यातील निवडक गीतांची ही ऑनलाईन मैफल आहे. सिंफनी गृप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेलफअर ट्रस्ट अमरावती एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे. गुलजार स्पेशल गीतांची ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 8.३० वाजता होणार आहे. ही मैफल सिंफनी स्टुडिओचे फेसबूक पेज व सिंफनी स्टुडिओचे युट्यूब चॅनल (सिंफनी ट्यून्स) वर लाईव्ह असणार आहे.

या मैफलीत अरविंद व्यास, संजय व्यवहारे, जयंत वाणे, गुरूमूर्ती चावली, डॉ. नयना दापूरकर, पल्लवी राऊत हे गायन करणार आहेत. प्रीती मिश्रा देखील या मैफलीत निवेदन करतील. संगीत संयोजन सुनित बोरकर यांचं आहे. पियानोची साथ सचिन गुडे यांची आहे. तबल्याची साथ विशाल पांडे करणार आहेत.

इंडिया वॉइस फेस्ट मध्ये दोन कॅटेगरीमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फैलोशिप आणि कर्मवीर चक्र अवार्डने सम्मानित तसेच जगविख्यात सुप्रसिद्ध अनाउंसर हरीश भिमानी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नासीर खान हे कार्यक्रमाचे निवेदन करतील हे विशेष. याचं दर्जेदार चित्रिकरण अमिन गुडे यांनी केलं आहे.

जुना बायपास रोडवरील कलोतीनगरातील सिंफनी स्टुडिओत या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. नव्या कलावंतांनासुद्धा विविध उपक्रमांत संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळविले आहे.

कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/r5uE7evs-q0

Symphony Tunes हे Youtube channel नक्की Subscribe, Like and share करा 

 

हेदेखील वाचा

फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी

हेदेखील वाचा

झरी येथील महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.