वि. वाय. एम. ब्लड नेटवर्कतर्फे बालसदन मध्ये दिवाळी साजरी

शैक्षणिक साहित्य आणि फराळाचं वाटप

0 469

वणी: वणी येथील बालसदन येथे शुक्रवारी वि. वाय. एम. ब्लड नेटवर्क महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी छोट्या अनाथ मुला मुली सोबत दिवाळी केली. यावेळी त्यांना चित्रकला वही, कलर, पेन्सील खेळणी व फराळांचे वाटप करण्यात आले.

फटाके फोडुन प्रदूषण करणे, पैशाची उधळपट्टी व निसर्गाचा ऱ्हास करणे त्यामुळे तिथल्या मुलांना शालेय साहित्य व फराळ देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. याच दिवशी एका विद्यार्थ्याचा वाढदिवसही होता. हा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी ब्लड नेटवर्कच्या सदस्यांनी चिमुकल्यांशी गप्पा मारल्या.

यावेळी बालसदनच्या सुलोचना, तसेच बालसदनची चिमुकली मंडळी, वि. वाय. एम. ब्लड नेटवर्क महाराष्ट्र चे कार्यकर्ते सुहास वनकर, गोकुल जुमनाके, जयंत उदकवार, गणेश मुद्दमवार, केतन ठाकरे, प्रियल पथाडे, चेतन मँकलवार, राजु मँकलवार, मंगेश झाडे, वैभव बोलपेलवार हे उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.