खळबळजनक: डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

0 14

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुपरिचित डॉक्टर डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने दोन इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सध्या त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

रामपुरा वार्ड जत्रा रोड येथे डॉ. पद्माकर मत्ते यांचा दवाखाना आहे. या दवाखान्यात दुपारी 1 वाजताच्या सुमारास स्प्लेंडर या दुचाकीने दोन अज्ञात इसम आले. त्यातील एक इसम बाहेर थांबला तर दुसरा इसम दवाखान्यात गेला. यावेळी डॉ. मत्ते हे कॅबिनमध्ये बसून होते. आत गेलेल्या हल्लेखोराने डॉ. मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

हल्ला झाल्यावर दवाखान्यात एकच गोंधळ उडाला. हल्लेखोर बाहेर पळून गेला. बाहेर थांबलेल्या हल्लेखोराच्या साथीदाराने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी सुरू न झाल्याने त्यांनी गाडी तिथेच ठेवली व पळ काढला. त्यातील एक हल्लेखोर तलावाच्या दिशेने तर त्याचा दुसरा साथी रामपुरा वार्डाच्या गल्लीतून पळून गेला. 

या हल्ल्यात डॉ. मत्ते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे.

हे देखील वाचा:

रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.