अजय कंडेवार यांची IHRAO च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

मानवाधिकार क्षेत्रात IHRAO चे उल्लेखनीय कार्य

0 15

विवेक तोटेवार, वणी: इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऍम्बेसेडर ऑर्गनायझेशनच्या (IHRAO) जिल्हाध्यक्षपदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अजय संजय कंडेवार यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट डॉ. अविनाश सुकुंडे यांनी केली आहे. त्यांच्या कामाचा व्याप आणि व्यासंग बघून ही निवड करण्यात आली आहे.

अजय कंडेवार हे मुळेच राजूर येथील असून व्यवसायाने ते शिक्षक आहे. विविध सामाजिक कार्यात त्यांचा कायम सक्रिय सहभाग असतो. मानवाधिकार या क्षेत्रात इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऍम्बेसेडर ऑर्गनायझेशन कार्यरत आहे. मानवाधिकार क्षेत्रातील त्यांचा पुर्वानुभन बघता त्यांच्या निवडीबाबत परिसरात कौतुक होत असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.