सासुरवाडीहून परतताना जावयाचा भीषण अपघातात मृत्यू

खांदल्याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

0 12

विवेक पिदूरकर, शिरपूर:  होळीनिमित्त सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा शिरपूर-कोरपना रोडवर खांदला गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात जावई जागीच ठार झाला. हि घटना दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान घडली मृतकाचे नाव पांडुरंग झाडे (42) असून ते नायगाव (बु) येथील रहिवाशी होते.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील नायगाव (बु) येथील रहिवाशी असलेले पांडुरंग झाडे यांची खांदला येथे सासुरवाडी आहे. होळीच्या निमित्ताने ते खांदला येथे सासरे पखाले यांच्याकडे पत्नी व दोन मुलीसह गेले होते. आज दुपारी जेवण करून ते 3.15 वाजताच्या दरम्यान नायगाव येथे री परतण्यास निघाले. तर त्यांची पत्नी व मुली माहेरी थांबले. दरम्यान गावाबाहेर निघताच त्यांच्या दुचाकीला (MH29 U9440) बांदुरकर यांच्या शेघताजवळ एका भरधाव वाहनाने जबर धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला व शव विच्छेदन करीता वणी ग्रामीण रुग्णालय पाठविले. प्रकऱणाचा तपास प्रमोद जुणूनकर करीत असून अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे. पांडुरंग यांना दोन मुली असून त्यांच्या अपघाती मृत्यूने नायगाव (बु) सह सासुरवाडी खांदला येथे शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा:

शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.