पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

ग्रामीण भागात कोरोनाचे दहशत, आज तालुक्यात 31 रुग्ण

0 11

जब्बार चीनी, वणी: रविवारी तालुक्यात कोरोनाचे 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तालुक्यात 31 रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून या रुग्णांमध्ये एकट्या पिंपळगावातील 25 रुग्ण आहेत. याशिवाय भालर वसाहत, कुरई, गणेशपूर, बोर्डा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर झरी जामणी तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे आढळून आले आहेत.

मंगळवारी दिनांक 30 मार्च रोजी 217 संशयीतांचे अहवाल यवतमाळ येथून प्राप्त झाले. यात 25 पॉजिटिव्ह आलेत तर 192 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 162 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 156 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 93 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 666 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 7 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 77 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 14 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 43 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 20 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1474 रुग्ण आढळून आलेत. यातील 1371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

सासुरवाडीहून परतताना जावयाचा भीषण अपघातात मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.