वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

लाईनचे काम करत असताना घडली दुर्घटना

0 19

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पो.स्टे. अंतर्गत वेळाबाई (मोहदा) येथे विजेच्या खांबावर काम करीत असताना विजेचा शॉक लागून तरुण पोलवरून खाली पडला. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवार 25 मार्च रोजी दुपारी 11 वाजता दरम्यान ही घटना घडली. अमर मारोती उरकुडे (26) असे मृत युवकाचे नाव आहे. घरातील एकमेव कर्ता व्यक्ती गेल्याने उरकुडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माहितीनुसार मृतक हा कंत्राटी पद्दतीवर गावात वीज सेवक म्हणून काम करीत होता. गुरुवारी दुपारी 11 वाजता अमर इलेक्ट्रिक पोलवर चढून दुरुस्ती कार्य करीत होता. मात्र खांबवरील तारांमध्ये वीज प्रवाह सुरु असल्यामुळे त्याला विजेचा जोरदार शॉक लागून तो खांब्यावरून खाली कोसळला.

या अपघातात अमर गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी अमरला ऑटोमध्ये टाकून शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे तिथून त्याला ऍबुलेन्समधून वणी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वणी ग्रामीण रुग्णालयात अमर याचा मृतदेहाचे पोस्टमार्टम करून वेळाबाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतक अमर हा गरीब घराचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मागे आई वडील व बहीण असून घरातील एकमेव कर्ता गेल्याने उरकुडे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.

हे देखील वाचा:

मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री

आज तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, चिखलगाव येथे 3 पॉजिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.