झरी येथे संभाजी ब्रिगेडच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

0 16

सुशील ओझा, झरी: येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात 23 मार्च रोजी शहिद दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते. संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक तुषार उमाळे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सरोज देशमुख, पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यात मुकुटबन झरी व शिबला येथे शासकीय रुग्णालय असून जवळपास 106 गावातील रुग्णांचा संपर्क या तीन रुग्णालयाशी येतो. परंतु अनेकदा 108 ऍम्बुलन्सचा उपयोग होत नसल्याने खासगी वाहन घेऊन रुग्णांना उपचाराकरिता बाहेर गावी घेऊन जावे लागते. गरीब जनतेला हा खर्च परवडण्यासारखे नाही. रुग्णांची ही गैरसोय लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेडद्वारा ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली.

या कार्यक्रमाला दिग्रसचे सरपंच निलेश येल्टीवार, वी.भ.वि.प माजी जिल्हाध्यक्ष समिर लेनगुळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष देव येवले यांच्यासह झरी तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा:

ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी

परीक्षा देऊन परत येणा-या तरुणीला दुचाकीची जोरदार धडक

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.