मारेगाव येथील प्रभाग क्र 3 मधील रस्ता व नालीचे बांधकाम करा

नागरिकांचे नगरपंचायतीला निवेदन

0 15

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये रस्ता व नालीची कोणतीही सुविधा नसल्याने या वार्डातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी रस्ता व नालीचे बांधकाम करावे या मागणीसाठी नगरपंचायत प्रशासनाला प्रभागातील नागरीकाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शहरातील वार्ड़ क्र. 3 हा सखल भागात असल्याने पावसाळ्यात शहरातील बहुतांश नालीचे व पावसाळ्यातील पाणी या ठिकाणी साचते. त्यामुळे या भागातील नागरिकांना संपूर्ण पावसाळाभर जाणे येणे करणे कठीण जाते. या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाला वार्डातील नागरिकांनी वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखवली.

आता या संदर्भात या वार्डातील नागरिकांनी पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले असून रस्ता व नाली बांधकाम करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना बाबुराव भोगेकर, भारत मत्ते, संजय मोघे, किशोर पाथोडे, सुधीर ढेंगळे, विजय नाखले आदी उपस्थीत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.