दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून अपघात… 2 ठार, 1 गंभीर

पुनवट गावाजवळ अपघात, मृतक चंद्रपूरचे रहिवासी

0 467

युवराज ताजणे, मेंढोली: वणी तालुक्यातील पुनवट गावाजवळील कोलवाशरीज लगत अनियंत्रित दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

चंद्रपूर येथील तीन युवक दुचाकी क्रमांक एम.एच. 34 ए एन 2446 ने मंगळवारी सायंकाळी वणीवरून चंद्रपूरला जात होते. पुनवट जवळील कोलवाशरीज लगत गाडीचालकाचे संतुलन जाऊन दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळली. यात गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन भीमदीप मेश्राम (२८ ) हा घटनास्थळीच ठार झाला.भाऊ पांडे (२७) याचा उपचारासाठी नेताना घुगूस पुढे मृत्यू झाला. तर प्रदीप वालकोंडे (२६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जमादार गणेश बोन्डे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.मृतकांवर भा.दं.वि. क्र. २७९,३६८,३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.