चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

सकाळी राजूर कॉलरी येथे उघडकीस आली घटना

0 15

विवेक तोटेवार, वणी: चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून राजूर कॉलरी येथील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. अमोल आनंद इंगोले (30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळपासून अमोल घरून निघाला होता. आज सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

सविस्तर वृत्त असे की अमोल आनंद इंगोले (30) हा राजूर कॉलरी येथील रहिवाशी होता. तो मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकायचा. मंगळवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान तो घरून निघाला होता. मात्र रात्रभर तो घरी परतलाच नाही.

सकाळी 8 वाजताच्या सुमारास काही लोकांना वार्ड क्रमांक 2 येथे असलेल्या परवेज लाईम ट्रेडर्स या चुनाभट्टीच्या छतावर त्याचा मृतदेह दिसला. त्याने रात्री चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी याची तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला.

अमोलचा गेल्या उन्हाळ्यातच प्रेमविवाह झाला होता. अमोलच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात जाते. याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. अमोलच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अमोल यांच्या पश्चात पत्नी, भाऊ व वहिनी असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास जमादार वासुदेव नारनवरे करीत आहे.

हे देखील वाचा:

यशोगाथा: मारेगाव तालुक्यातील तरुण शेतक-यांनी फुलवली झेंडुची शेती

सेक्स रॅकेट व्यवसायाला ‘ब्लॅकमेलिंग”चा जोडधंदा (भाग 4)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.