नांदेपेरा येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

आज सकाळची घटना

0 14

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे शनिवार सकाळी 8. 30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोहना येथील पोलीस पाटलांनी वणी पोलीसात तक्रार दाखल केली.

आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नांदेपेरा-वडकी मार्गावर एक इसम मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळून आले. याबाबत पोलीस पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या इसमाचे अंदाचे वय 50-55 आहे.

सदर इसम हा एखादा भिकारी असावा किंवा अन्न व पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या इसमाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्याची खून नसल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा पुढील तपास जगदीश बोरणारे करीत आहे.

हे देखील वाचा:

उकणी येथे वर्धा नदीच्या पात्रालगत शिरपूर पोलिसांची धाड

युवासेना राबवणार ‘घरोघरी शिवसेना’ अभियान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.