विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव येथील घटना, तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच

0 13

नागेश रायपुरे, मारेगाव: एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  सोमवारी 18 जानेवारीच्या रात्री 8.30 वाजता मारेगाव येथे घडली. मृतकाचे नाव प्रशांत शरद जांभुळकर (37) असे असून तो शहरातील प्रभाग क्र.6 मधला रहिवाशी होता.

मृतक प्रशांत हा मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकायचा. एकत्र कुटुंबात तो त्याच्या पत्नीसह वेगळ्या खोलीत राहायचा. एक महिन्यापासून प्रशांतची पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याने रुममधील पंख्याला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली.

कुटुंबातील व्यक्तींना ही घटना कळताच त्याला काही वेळात शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणी करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतक प्रशांत जांभुळकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मारेगाव पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

मृतकाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची तोडफोड

झरी तालुक्यात दिग्गजांना हादरा, मतदारांची परिवर्तनाला पसंती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.