वणीत साने गुरुजींची 121 जयंती साजरी

विविध संस्थांनी वाहिली आदरांजली

0 11

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 24 डिसेंबरला सकाळी मानवतेचे पुजारी, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींची 121 जयंती येथील साने गुरुजी चौकात साजरी झाली. 

येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा वणी, मित्र मंडळ व संस्कार भारतीने ही जयंती साजरी केली. या कार्यक्रमात साने गुरुजींच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन करून गुरुजींनी दिलेल्या शिकवणीची आज समाजाला सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर सागर मुने यांनी साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सादर केले. या प्रसंगी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार, विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे सचिव प्रा. अभिजित अणे, मित्र मंडळाचे सचिव राजाभाऊ पाथ्रडकर, संस्कार भारतीचे सागर मुने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक नवले, अर्जुन उरकुडे, प्रमोद सप्रे, विशाल काळे, शरद सरमोकदम, महादेव तिरणकार, उद्धव बेसरकर, प्रसन्न संदलवार, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार वामन गेडाम इत्यादी नागरिक उपस्थित होते.

हेदेखील वाचा

चला जादुच्या अद्भूत दुनियेत… वंडर वुमन आता वणीमध्ये

हेदेखील वाचा

ग्रामपंचायत अधिसूचने व्यतिरिक्त दाखल्याची मागणी करू नये

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.