आज वणी तालुक्यात 9 रुग्ण

नागरिकांनी राहावे दक्ष

0 15

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 डिसेंबरला तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, प्रगतीनगर 2, दामले फैल 1, अटारा काम्प्लेक्स 1 तर मुर्धोनी 2, चिखलगाव 1 आणि मुकूटबन 1 अशी रुग्णसंख्या आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

गुरुवारी यवतमाळ येथून 34 रिपोर्ट आलेत. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात व 30 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 42 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 5 जणांची पॉजिटिव्ह रॅपीड टेस्ट झाली तर 37 निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 43 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 138 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 67 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1063 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 973 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. गुरुवारी 04 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 67 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 34 जण होम आयसोलेट आहेत. 14 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 19 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.

सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा

दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे 2 हायवा जप्त

हेदेखील वाचा

बळीराम हरणे यांचे निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.