राजूर येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू

राजूर वांजरी शिवेवरची घटना

0 715

कुमार मोहरमपुरी, राजूर: वणी तालुक्यातील राजूर-वांजरी शिवेवर असलेले बेरार लाईम ह्या चुनाभट्टी परिसरात राहणारे व बकरी राखण करून गुजराण करणारे प्रेमानंद वानखेडे (७१) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

प्रत्यक्षदर्शी तेथील रहिवासी श्रीनिवास दासरी यांनी दिलेल्या माहिती नुसार, दुपारी 2.30 वा.चे सुमारास प्रचंड विजांचा कडकडाटासह परिसरात पाऊस सुरू होता. त्याच वेळेस प्रेमानंद वानखेडे रखणीतल्या बकऱ्या घराकडे परत आणीत असताना लिंबाचे झाड जवळ विजेचा प्रचंड लोळ वानखेडे यांचे डोक्यावर दिसून आला व त्याच क्षणी प्रेमानंद हे जमिनीवर कोसळले. त्यांच्या तिथेच ताबडतोब मृत्यू झाला. त्यानंतर श्रीनिवास दासरी व अन्य लोकांनी त्यांना उचलून घरी आणले व संबंधित विभाग जसे पोलीस व तहसील विभागाला माहिती देण्यात आली.

काही वेळानंतर मंडळ अधिकारी, पटवारी, पोलीस पाटील, पीएसआय घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली. परमानंद वानखेडे हे अत्यन्त गरीब परिस्थितीत जगत होते, त्यांच्या संपूर्ण परिवार कष्ट करून जगणारे असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.