आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

वणी शहरातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ

0 17

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण आरटीपीसीआर तर 4 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 4 रुग्ण वणी शहरातील तर 5 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात पळसोनी येथे 2 तर शिंदोला येथे 2 तर सुकणेगाव येथील एक रुग्ण आहे. आजच्या रुग्णांमुळे कोरोनाची तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 816 झाली आहे.

आज यवतमाळ हून 23 अहवाल प्राप्त झाले यातील 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 18 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. तर आज 32 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 4 संशयीत पॉजिटिव्ह तर 28 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 56 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 81 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 54 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 816 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 759 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 2 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात 54 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 25 जण होम आयसोलेट आहेत. 15 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 10 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

शहरात वाढतोय कोरोनाचा प्रकोप
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांनी पन्नाशी पार केली. वणी शहरातील दिवसेंदिवस रुग्णांची संख्या चिंतेची बाब ठरत आहे. 

हे पण वाचा:

शाळा क्रमांक 3 ला आग, तीन खोल्या जळून खाक

 

स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.