अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पळसोनी फाट्याजवळची घटना

0 14

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मारेगाव रस्त्यावर पळसोनी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 7.30 दरम्यान घडली. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत पळसोनी फाट्याजवळ अपघात घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीवरून वणी पोलीसचे दोन कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता दुचाकीस्वारच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच गतप्राण झाला होता. अपघातात मृत व्यक्ती बाबत पोलिसांनी माहिती काढली. मृतक राजूर कॉलरी (ता. वणी) येथील रामचंद्र गयाप्रसाद केवट (वय अंदाजे 30 वर्ष) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुर्घनेत ठार झालेला युवक आपल्या दुचाकी क्र. (MH29- BN 9810) ने रात्री 7.30 वाजेच्या सुमारास जात असताना पळसोनी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असावी. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

पोलिसांनी रामचंद्र केवटचे प्रेत वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मॉर्चरीमध्ये ठेवले आहे. मृत युवकाचा भाऊ बल्लारपूर येथे राहत असून पोलिसांनी तशी सूचना दिली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.