रक्ताच्या नात्याने दिली अखेरपर्यंत साथ

अपघातात ठार झालेले दोघे निघाले सखे भाऊ

0 17

नागेश रायपुरे, मारेगाव: करणवाडी फाट्यासमोर दुचाकीवरील दोन इसम अपघातात ठार झाले. ही घटना काल 31 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. यात एकाची ओळख पटली नव्हती. नंतर हे ठार झालेले दोन्ही इसम सखे भाऊ निघालेत. तुकाराम रामभाऊ उईके (51), विजय रामभाऊ उईके (48) रा.घाटंजी असे दोन्ही मृतकाची नावे आहेत.

शनिवारी 31 ऑक्टोबररोजी दोघेही घाटंजीवरून वणी येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकी (MH 29 BK 9102) ने आले होते. कार्यक्रम आटपून ते दोघेही दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले. वाटेतच करणवाडी फाट्यासमोर त्यांचा अपघात झाला. यात एकाच जागीच मृत्यू झाला, तर एकाने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान शेवटचा श्वास सोडला.

हा अपघात कशाने झाला हे मात्र कळू शकले नाही. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली किंवा ते स्लिप होऊन पडले असावेत अशा आहेत.

मृतक विजय उईके हे एस.टी.ड्रायव्हर असल्याचे समजते. विजय यांच्यामागे पत्नी, दोन मुलं आहेत. तर दुसरे मृतक तुकाराम हे शेतकरी असून यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या घटनेत दोन्ही भावांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.