‘ती’ पाण्यासाठी गेली आणि त्यांने तिची ‘अब्रू’ लुटली

सेवानगर येथील युवकास अटक

0 12

जितेंद्र कोठारी, वणी:  पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता त्या घरातील युवकाने बळजबरीने घरात ओढून तिच्यासोबत दुष्कर्म केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या बाबत 23 वर्षीय पीडितेने आपल्या पतीसह वणी पोलीस ठाण्यात येऊन दुष्कर्म झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी येथील सेवानगर भागात राहणाऱ्या 20 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

पीडिताने नोंदविलेल्या तक्रारीनुसार दि. 27 ऑक्टो. रोजी भटवळकर यांच्या घरी नळातून पिण्याचे पाणी भरण्याकरिता गेली होती. तेव्हा आरोपी चेतन भटवळकर (20) याने तिला बळजबरीने घरात ओढून पीडितेवर बलात्कार केला. त्यावेळी आरोपीची आई कामासाठी घराबाहेर असून आरोपी घरात एकटाच होता.

असे उघडकीस आले दुष्कर्म
घाबरलेल्या महिलेने घटनेबाबत दोन दिवसानंतर 30 ऑक्टो. शुक्रवारी तिच्या पतीला सांगितले. पीडितेचा पती एका दुकानात खासगी नोकरी करतो. त्यानी घडलेल्या घटनेबाबत त्याच्या मालकाला माहिती देऊन काय करू असे विचारले. मालकाच्या सल्ल्यावरून पीडिता व तिच्या पतीने शुक्रवारी वणी पोलीस स्टेशन गाठून सेवानगर येथील चेतन भटवळकर (20 वर्ष) विरुद्ध दुष्कर्म केल्याची तक्रार दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम 376, 354 अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपी चेतन भटवळकर यास अटक केली आहे. तर पीडितेला वैद्यकीय परीक्षणसाठी यवतमाळ पाठविण्यात आले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.