‘चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या’

शिवसेनेची मागणी, तहसीलदारांना दिले निवेदन

0 12

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला भर चौकात फासावर लटकवा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात आज बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

26 ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील धामणी येथे एका 5 वर्षाच्या चिमुकलींवर गावातीलच एका 40 वर्षीय नराधमांने लैंगिक अत्याचार केला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. असे अमानवीय कृत्य पुन्हा कोणी करू नये म्हणून अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमास भर चौकात फासावर लटकवण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सेनेचे तालुका प्रमुख तथा पं.स. उपसभापती संजय आवारी, उप.ता.प्रमुख राजू मोरे, शहर प्रमुख अभय चौधरी, सुरेश पारखी, गणेश आसुटकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.