नितीन मनवर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

किक बॉक्सिंग अससोसिएशनची जबाबदारी

0 14

सुशील ओझा,झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे कार्यरत असलेले शारीरिक शिक्षक तथा शतकाँन कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशनचें जिल्हा सचिव नितीन अशोक मनवर यांची महाराष्ट्र किक बॉक्सिंग अससोसिएशन तर्फे जिल्हा किक बॉक्सिंग अससोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी महाराष्ट्र किक बॉक्सिंगचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी घोषणा केली.

नितिन मनवर यांनी जिल्हातील पुसद, दिग्रस व मध्यप्रदेश येथील शाळेत शारीरिक शिक्षक तथा कलाशिक्षक म्हूणन काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र किक बॉक्सिंग अससोसिएशनच्या यवतमाळ किक बॉक्सिंग असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीमुळे शाळेचे मुख्याधापक सुभाष गजभिये. संचालक आगुलवार, हुडे, उत्तरवार. बरशेट्टीवार, मल्लुरवार, पुंगुलवार, गड्डेवार व तसेच इतर शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
  (वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.