पैशांचा वाद, त्याने केला घात

मांगरूळ येथे महिलेचा विनयभंग

0 14

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मांगरुळ येथे घरी काम करत असताना एका महिलेवर शेजारी राहणाऱ्या दिराने घरी येऊन अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्या प्रकरणी मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईश्वर भाऊजी राजगडकर (36)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. पैसा आणि संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.

प्राप्त माहिती नुसार यात आरोपी नेहमी आपल्या पीडितेला अपशब्द बोलायचा. यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून संपत्तीच्या कारणावरून वाद सुरू होता. अशातच 21 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान ईश्वर राजगडकर याने घरी येऊन काठीने डोक्यावर मारले. भांडी फेकून मारली.

बाथरूमचा दरवाजा तोडला. जीवे मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादीचा हात पकडून अश्लील बोलत विनयभंग केला. आरोपीपासून आमच्या जीवाला धोका आहे. तो कधी काय करेल हे सांगता येत नाही असाही आरोप दिलेल्या तक्रारीत केला आहे. या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.