सावधान… तालुक्यात कोरोनाची पुन्हा लाट?

आज 22 रुग्ण, सुंदरनगर, कुरईत कोरनाचा कहर

0 11

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 22 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये आर-टीपीसीआर टेस्टनुसार 20 तर रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार 2 पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी कुरई येथे 5 रुग्ण, सुंदर नगर येथे 4 रुग्ण, चिखलगाव येथे 3, तेजापूर, भालर, निवली येथे प्रत्येकी 1 तर शहरातील पोलीस कॉर्टर येथे 4, रामपुरा, तेली फैल, शाळा क्र. 1 जवळ प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 746 झाली आहेत.

आज यवतमाळहून 86 अहवाल प्राप्त झाले. यात 20 पॉजिटिव्ह तर 66 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 78 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 76 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 50 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 50 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 71 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 746 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 674 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 4 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 71 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 19 जण होम आयसोलेट आहेत. 22 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 11 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट?
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना गेल्या 4-5 दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल एकाच दिवशी 14 रुग्ण आढळल्यानंतर आज हा आकडा आणखी वाढला आहे. यात ग्रामीण भागातील संख्या अधिक आहे. कुरई व सुंदरनगरमध्ये सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे आता शहरातही रुग्णसंख्येच अचानक वाढ झाली आहे. 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.