भाऊराव पाटील मोहितकर यांचे निधन

वेकोलिचे सुनील मोहितकर ह्यांना पितृशोक

0 10

जब्बार चीनी, वणी: निवली येथील भाऊराव पाटील मोहितकर (75) यांचे रविवारी निधन झाले. कॅंसरसोबत लढताना 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता निवली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. वेकोलि वणी नार्थ आयटक चे अध्यक्ष सुनील मोहीतकर ह्यांचे ते वडील होते.

धडाडीचे आणि कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रामाणिक कर्तृत्तावाचा ठसा उमटवला. शिक्षकम्हणून ते विद्यार्थीप्रिय होते. गावाचे सरपंच म्हणून त्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतलेत. पोलीस पाटीलम्हणून त्यांची कारकीर्द चोख होती. कृषि उत्पन्न बाजार समितिचे संचालक या पदावरदेखील ते कार्यरत होते.

भाऊराव मोहितकर ह्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना आणि नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.