शिंदोला येथील मीराबाई साळवे यांचे निधन

सत्प्रवृत्तीच्या मीराबाईंच्या जाण्याने सर्वत्र हळहळ

0 11

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील मीराबाई दत्तूजी साळवे (76) यांचे दि. 28 सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बापूजी साळवे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पार्थिवावर शिंदोला येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती दत्तूजी, मुले बापूजी आणि देवानंद, लताताई, नीताताई सूना, मदन, महेश, मयूर, करणं नातवंड, नातसुना, पतवंड आणि बराचसा आप्त परिवार आहे. 

मीराबाई साळवे यांच्या  घराण्याला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे घरात नेहमी भक्तिमय वातावरण असते. अनेकदा त्यांनी राष्ट्रसंताच्या समाधी दर्शनासाठी सहकुटुंब मोझरीची वारी केली होती. गावात तुकडोजी महाराज भजनस्पर्धेच्या आयोजनात साळवे घराण्याचा मोलाचा वाटा असतो. मीराबाईच्या मनमिळाऊ स्वभावानं त्यांनीं कुटूंबातील लहानथोरांची मने जिंकली होती. तिच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.